राजकारण
राष्ट्रवादीच्या आमदारांची आज परीक्षा; शरद पवार, अजित पवारांच्या स्वतंत्र बैठका
राज्यात एकापाठोपाठ एक राजकीय घडामोडी घडत आहेत.
राज्यात एकापाठोपाठ एक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत युती सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. त्यांच्यासोबत काही आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
याच पार्श्वभूमीवर आता अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची आज सकाळी 11 वाजता बैठक बोलवली आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनीही राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक दुपारी 1 वाजता आयोजित केली आहे. तसेच त्यांना व्हिपही बजावण्यात आले आहेत. ज्या गटाच्या बैठकीत सर्वाधिक आमदार, खासदार आणि कार्यकर्ते उपस्थित असतील तोच गट थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा करू शकतो.
त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोणत्या बैठकीला उपस्थित राहणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.