जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी आव्हाडांना अटक केली होती. त्यांनतर आज आव्हाड यांना जामीन मिळणार की तुरुंगात जावं लागणार यावर आज न्यायालयात सुनावणी झाली होती. आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच जितेंद्र आव्हाडांकडून जामिनासाठी अर्ज दाखल त्यावर आता सुनावणी झाली असून जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर केला आहे.
काल दिवसभर जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेने राजकरण पेटले होते. मात्र, काल अटक आणि आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या 12 सहकाऱ्यांना पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर केला आहे. ठाणे सत्र न्यायालयात हा जामीन मंजूर केलाय. तपासाला सहकार्य करण्याच्या अटीवर न्यायालयाने केला जामीन मंजुर केला.