Chhagan Bhujabal
Chhagan Bhujabal Team Lokshahi

शिवराय, फुले, शाहू यांच्या विरोधात बोलतील, त्यांना विरोध करणारा जो कोणी असेल तो आपला- भुजबळ

काल ज्याने शाई फेकली त्याच्यावर 307 कलम लावलं, खुनाचा प्रयत्न? मला हे कळलंच नाही.
Published by :
Sagar Pradhan
Published on

भाजप नेते व राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर राज्यात एकच त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात होता. याच दरम्यान काल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी पिंपरी-चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली. त्यावर अनेक राजकीय मंडळींची प्रतिक्रिया येत असताना त्याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे.

Chhagan Bhujabal
माफी मागितल्यावर शाईफेकणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही- पंकजा मुंडे

काय म्हणाले छगन भुजबळ?

ज्याने शाई फेकली त्याच्यावर 307 कलम लावलं, खुनाचा प्रयत्न? मला हे कळलंच नाही, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्त्युत्तरात हे कलम का लावलं याचं कारण सांगितलं आहे.शाई फेक करणारा फुले, शाहू आंबेडकरांचा पाईक आहे, कुणाच्या जीवाला धोका निर्माण होईल अस वागू नये हे ठीक आहे. पण, वाटेल ते बोलून आपण सुद्धा लोकांना किती पेटवणार आहात? असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

पुढे भुजबळ म्हणाले, की शाई फेक प्रकरण अनेकवेळा झालं. नाशिकला साहित्य संमेलनात संपादक गिरीश कुबेर त्यांच्यावर शाई फेक झाली. त्यांनी शाई पुसून भाषण केले. शाई फेकणाऱ्याला पकडलं, ते निघून गेले. काल ज्याने शाई फेकली त्याच्यावर 307 कलम लावलं, खुनाचा प्रयत्न? मला हे कळलंच नाही. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू यांच्या विरोधात बोलतील, त्यांना विरोध करणारा जो कोणी असेल तो आपला, असंही छगन भुजबळ शेवटी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com