'धर्माची देवळे व देवळाचा धर्म'... फडणवीसांच्या दाखल्यावर मिटकरींचा सवाल
राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना, भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त विधानानंतर चांगलाच वाद उध्दभवला आहे. त्यानंतर पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा वाद शांत झाला आहे. मात्र, शिंदे फडणवीस सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यादरम्यान, उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चंद्रकात पाटील यांनी प्रबोधनकारांच्या पुस्तकातील 'भीक' या शब्दाचा संदर्भ दिला होता. त्यानंतर आज देखील अधिवेशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याच पुस्तकाचा संदर्भ दिला. त्यावरूनच आता राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसांना सवाल केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंना संदर्भ दिल्यानंतर आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी शाळेच्या निधीवरून भीक या शब्दाचा उल्लेख केला. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावेळी प्रबोधनकार ठाकरेंच्या "माजी आत्मकथा " या पुस्तकाचा दाखला दिला. त्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीसांना ट्विटरवरून सवाल केला आहे.
अमोल मिटकरी यांचे ट्विट?
प्रबोधनकार ठाकरेंच्या "माजी आत्मकथा " या पुस्तकाचा दाखला देणारे देवेंद्रजी फडणवीस यांना प्रबोधनकारांचे "धर्माची देवळे व देवळाचा धर्म" हे मान्य आहे का ?आणि एक प्रकारे भीक मागणे या शब्दाचे तुम्ही समर्थन करत आहात का ?महाराष्ट्राला उत्तर द्यावे. असा सवाल मिटकरी यांनी यावेळी केला आहे.