शिवसेना प्रमुखाशिवाय हिंदुहृदयसम्राटांची ओळख नाही; अजित पवारांनी शिंदेंचे टोचले कान
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांचे आज तैलचित्राचे अनावरण झाले आहे. या सोहळ्यात सरकारच्या वतीने अनेकांची भाषणे झाले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे देखील यावेळी भाषण झाले. यादरम्यान, सभागृहात अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. तसेच, यावेळी प्रस्तावनेत बाळासाहेबांचा केवळ हिंदुहृदयसम्राट उल्लेख केल्याने अजित पवारांनी शिंदे सरकारचे कान टोचले आहेत. हिंदुहृदयसम्राट असे नाव लिहिल्याची चर्चा आहे. त्याऐवजी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असे लिहावे, असे त्यांनी म्हंटले आहे.
बाळासाहेबांची आज जयंती आहे. त्यांच्या चित्रफितीत हा कार्यक्रम कसा ठरवला गेला हे सांगितले. राहुल नार्वेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या चित्रफितीतून झंझावात आपण पाहिला. आज तैलचित्राचे अनावरण होणार आहे. भव्यदिव्य स्वरुपात कार्यक्रम साजरा करण्याचे नियोजन अभिनंदनीय आहे.
मराठी माणसासाठी व महाराष्ट्रासाठी आनंदाची व स्वाभिमानी गोष्ट आहे. त्यांचे कार्यक्रम जनमानसात माहिती व्हावी. त्यांचे सारखे जरब असलेले नेतृत्व दुसरे नाही. त्यांच्या जगण्यात वागण्यात दुटप्पीपणा नव्हता. जे पोटात तेच ओठात असे ते वागायचे. बाळासाहेबांचा विचार पुढे नेत असताना हे सगळं आत्मसात करण्याची गरज आहे, असा निशाणा अजित पवारांनी शिंदे गटावर साधला.
शिवसेना प्रमुखाशिवाय बाळासाहेबांची ओळख नाही. हिंदुहृदयसम्राट असे नाव लिहिल्याची चर्चा आहे. त्याऐवजी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असे लिहावे, अशी विनंती त्यांनी सभागृहात केली. ते हिंदुत्ववादी होते. पण, त्यांना मुस्लिम, ख्रिश्चन धर्माचा आदर होता. मुस्लिम विरोधात होते म्हणणे होते योग्य नाही. भारतविरोधी पाकिस्तान धार्जिण्या मुस्लिमांविरोधात होते, असेही त्यांनी म्हंटले आहे.
भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र आणण्याचे काम बाळासाहेबांनी केले. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांना पाठिंबा देण्याचे काम त्यांनी केले. प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. ते केवळ हिंदुहृदयसम्राट नव्हते, तर कर्तृत्व सम्राटही होते, असे म्हणत अजित पवारांनी भाजपासह शिंदेंना टोला लगावला.
देशातील पंतप्रधानांपर्यंत प्रत्येकाला ते आपले वाटायचे. बाळासाहेबांची युती सरकारच्या काळात त्यांनी नितीन गडकरींवर सोपवली होती. गडकरी कुठल्या पक्षाचे हे न पाहता त्यांनी संपूर्ण ताकद दिली. हे त्यांच्या दूरदृष्टीचे ते उदाहरण होते.
अक्कू यादवला महिलांनी कोर्टात जाऊन यमसदनी पाठवले. त्यावेळी स्वसंरक्षणासाठी हत्यार घेतल्यानंतर महिलांच्या पाठिशी बाळासाहेब होते. तैलचित्र आम्हीही पाहिलेले नाही. आम्ही कुठलाही मानापमान न पाहता आलो. विठ्ठलाला जाताना कुणीही हातातील झेंडा पाहत नसतो. आज हिंदुहृदयसम्राट असते तर ते कोणत्या शब्दांत बोलले असते याचा विचार तुम्ही करा, असे शालजोडेही अजित पवारांनी शिंदे गटला लगावले आहेत.