राज ठाकरे आणि शिंदे-फडणवीस एका मंचावर अजित पवार म्हणाले, काहीही...
काल मनसेच्या दीपोत्सवाला शिवाजी पार्क येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळेला मनसे प्रमुख राज ठाकरे व शिंदे-फडणवीस एकाच मंचावर पहिल्यांदा दिसून आले. हे तिघेही एका मंचावर दिसल्यामुळे राज्याचा राजकीय वर्तुळात तेव्हापासून युतीच्या जोरदार चर्चा होत आहेत. त्यावरच आता राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
दिवाळीनिमित्त पवार कुटुंब बारामतीत आहे. यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, राज ठाकरे आणि शिंदे-फडणवीस एकत्र आल्यास काहीही चुकीचं नाही. काही अडचण नाही.
दिवाळीचा सण आहे. दोन वर्षानंतर हा सण आपण साजरा करतोय.त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावं. शुभेच्छा द्याव्यात. त्यात चुकीचं काय? राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तिघे एकत्र आले असतील तर त्याच्यात चुकीचं काय आहे?, असे विधान अजित पवार यांनी यावेळी बोलताना केले.