एकनाथ शिंदे यांना लोकं चिठ्ठ्या देतात आणि ते सारखं वाचून दाखवतात; अजित पवारांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक वाद बाचाबाची सुरू असताना आता महाविकास आघाडीत सुध्दा अंतर्गत वाद होताना दिसत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांना लोकं चिठ्ठ्या देतात आणि ते वाचतात, मला कुणी चिठ्ठ्या द्यायचे धाडस करणार नाही. अशी टीका अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली आहे.
काय म्हणाले नेमकं अजित पवार?
साताऱ्यात बोलताना अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना लोकं चिठ्ठ्या देतात आणि ते वाचतात. पॉइंट काढून दिले, छोटी चिठ्ठी दिली ते ठीक आहे. पण सारखं वाचून दाखवतात. मला कुणी चिठ्ठ्या द्यायचे धाडस करणार नाही. अशी बोचरी टीका त्यांनी केली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे 2 ते 3 दिवस साताऱ्यात येऊन राहतात. त्यामध्ये येऊन झाडं बघतात. कधी स्ट्रॉबेरी बघतात. हे बघून कुठं शेती होती का. आणि दुसरीकडे 65 फाइल काढल्या म्हणे. अहो तीन-तीन हजार फाइल्स पडून आहेत. याच्यामध्ये राज्याचे नुकसान होत आहे. अशी टोला त्यांनी मारला.
पुढे ते म्हणाले की, मला वाटलं होतं साताऱ्याचा माणूस आहे. ठाण्यात जाऊन राहतात. पण काही खरं नाही. राज्याचे नुकसान होत आहे. बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाही. दीड दोन लाख लोकांना नोकऱ्या मिळणारे प्रकल्प बाहेर गेले, एक प्रकल्प आणायची धमक यांच्यात नाही असा आरोपही अजित पवार यांनी गेला. काही दिवसांपूर्वी एक गाजर दाखवलं. म्हणे 75 हजार शासकीय नोकऱ्या आणणार. मुला मुलींनी नोकरीला लावणार आहे. त्याचे काय झाले. कुणी मंत्रालयात बसायला तयार नाही. एप्रिल मे मध्ये पाऊस पडलेला कधी बघितलाय का? अवकाळी पाऊस आला, काही ठिकाणी नद्यांना पुर आला, फळबाग आणि बारमाही पीकाचे नुकसान झाले आहे. पंचनामा करणार म्हणताय अहो कधी करणार हे तरी सांगा. सगळं करतोय म्हणताय काही करत ढिम्म सरकार आहे. आमदार निधी आम्ही वाढवला. अशी टीका त्यांनी केली.