Ajit Pawar | Uddhav Thackeray
Ajit Pawar | Uddhav ThackerayTeam Lokshahi

मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे पायउतार झाले, त्याचा बदला आपल्याला घ्यायचा; अजित पवारांचे विधान

भाजपला धक्का देण्यासाठी पुन्हा आपल्याला ताकदीने काम करून दाखवायचे आहे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

एकीकडे राज्यात प्रचंड राजकीय गोंधळ सुरू असताना, त्यातच विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर आता कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली. सर्वच पक्षाकडून जोरदार रस्सीखेच त्याठिकाणी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीच्या वतिने उमेदवार असलेल्या नाना काटे यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच मेळाव्यात बोलत असताना राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी भाजपवर आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

Ajit Pawar | Uddhav Thackeray
'भाजपात घ्या अशी विनवणी केली' देशमुखांबद्दल महाजनांनी केला गौप्यस्फोट

काय म्हणाले अजित पवार?

चिंचवड मतदार संघात बोलत असताना अजित पवार म्हणाले की, मविआचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी अतिशय चांगले काम केले पण अचानक मध्ये चटर पटर लोक आले आणि सत्ता गेली. त्यामुळे मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे यांना सोडावं लागले त्याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे. विधानपरिषदेत जशी एकच जागा भाजपाला मिळाली असून बाकी ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. ते पाहता भाजपला धक्का देण्यासाठी पुन्हा आपल्याला ताकदीने काम करून दाखवायचे आहे. अशा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पुढे ते म्हणले की, ज्यांच्यामुळे मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे पायउतार झाले आहे त्याचा बदला शिवसैनिकांनो आपल्याला घ्यायचा आहे. या शहरात पहिल्यांदाच मला निवडणूक दिले आहे. काही माणसं आता नाहीत काही वृद्ध झाली आहे. त्यावेळी शिवसैनिकांचे काम मी पहिली आहे. हिरीरीने काम करायचे. उमेदवार निश्चित करत असतांना मी सर्वांशी बोलत होतो. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची परवानगी घेऊन नाना काटे यांची उमेदवारी जाहीर केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com