Sharad Pawar
Sharad PawarTeam Lokshahi

'खोक्याचे आणि फोडाफोडीचे राजकारण हे लोकांना मान्य नाही' कर्नाटक निकालावरून पवारंची भाजपवर टीका

224 जागांपैकी काँग्रेसला जवळपास 133 जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपला फक्त 67 जागा मिळताना दिसत आहे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

संपूर्ण देशाचे लक्ष आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे आहे. या निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या निकाला नंतर राज्यात काँग्रेसचं वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. कर्नाटक निवडणुकीत 224 जागांपैकी काँग्रेसला जवळपास 133 जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपला फक्त 67 जागा मिळताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आंनदाचे वातावरण आहे. काँग्रेसकडूनही जोरदार जल्लोष साजरा करण्यात येत आहे. यावरच बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.

Sharad Pawar
'हा निकाल देशाला एक नवी दिशा देणारा' भास्कर जाधवांची भाजपवर जोरदार टीका

काय म्हणाले शरद पवार?

कर्नाटकात काँग्रेसच्या विजयाचा मार्ग मोकळा झालेला दिसत आहे. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, निपाणीत आमचा विजयासाठी प्रयत्न आहे. विजयाची खात्री नाही, पण राष्ट्रवादीला तेथे चांगला प्रतिसाद मिळाला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सभा घेऊन देखील त्यांना यश आलेलं नाही. असे शरद पवार म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जनतेचा रोष आहे. खोक्याचे आणि फोडाफोडीचे राजकारण हे लोकांना मान्य नाही. याच उत्तम उदाहरण हे कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जनतेने सफसेल नाकारलं. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही. तेथे फोडाफोडीचे राजकारण करून सत्तेचा गैरवापर भाजपने केला. कर्नाटकमध्ये देखील तीच अवस्था याआधी पाहायला मिळाली होती. अशी टीका त्यांनी भाजपवर केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com