लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी; मुंडे, खडसेंवर महत्वाची जबाबदारी
मुंबई : कर्नाटकातील निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकींसाठी कंबर कसली असून मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक आज पार पडली. या बैठकीत धनंजय मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या खांद्यावर महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. दरम्यान, शरद पवार यांनी महाविकास आघाडी भक्कम ठेवा, लोकसभा विधानसभा एकत्रच लढावयाच्या आहेत हे स्पष्ट केले आहे.
कर्नाटकमध्ये जो ट्रेंड आहे तो महाराष्ट्रात आहे. भाजप नको, त्यांची सत्ता येऊ नये असा मतदारांनी कौल दिला आहे. जनमत भाजप विरोधात आहे, जो पक्ष भाजप बरोबर जाईल त्यांना कर्नाटकमध्ये देखील मत दिले नाही. तसेच महाराष्ट्रात चित्र आहे. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी दोन क्रमांकावर आहे त्याची जबाबदारी विभागावर नेत्यांना दिली आहे. तर, राष्ट्रवादीत तीन वर्षांपेक्षा जास्त काळ जिल्हाध्यक्ष-तालुकाध्यक्ष असणाऱ्यांना बदलण्यात येणार आहे. राष्ट्रवादीकडून विभागवार शिबिरे घेण्यात येणार असून या ठिकाणी राज्यातील प्रश्नांवर चर्चा होणार आहे.
विभागवार नेत्यांना जबाबदारी
विदर्भ नागपूर विभाग : अनिल देशमुख
विदर्भ अमरावती विभाग : राजेंद्र शिंगणे
कोकण विभाग (ठाणे पालघर) : जितेंद्र आव्हाड
मराठवाडा विभाग (नाशिक, नगर) : धनंजय मुंडे
पश्चिम महाराष्ट्र (कोल्हापूर, सातारा, सांगली) : शशिकांत शिंदे
पश्चिम महाराष्ट्र (पुणे) : सुनील शेळके
पश्चिम महाराष्ट्र (कोल्हापूर) : अशोक पवार
खान्देश : एकनाथ खडसे, अनिल पाटील
कोकण विभाग : अनिकेत तटकरे, शेखर निकम
राष्ट्रवादी पक्षातंर्गत निवडणूक अधिकारी
राज्य : जयप्रकाश दांडेगावकर
मुंबई : दिलीप वळसे पाटील