pawar fadanvis
pawar fadanvisTeam Lokshahi

Vidhan Parishad Election : राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी तिसरा उमेदवार जाहीर

भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही अतिरिक्त उमेदवार जाहीर
Published on

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) भाजपने (Bjp) सहा उमेदवार जाहीर करत निवडणूक चुरशीची केली आहे. आता यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही (NCP) उडी घेतली असून तिसरा उमेदवार जाहीर केला आहे. तिसरा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवाजीराव गर्जे (Shivajirao Garje) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.

pawar fadanvis
तारीख पे तारीख! महाराष्ट्रात मान्सून येणार तरी कधी? हवामान खातंच संभ्रमात

विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे यांना तिसरा उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. तर भाजपनेही अतिरीक्त दोन उमेदवार दिल्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची निवडणुकही चुरशीची होणार हे नक्की. परंतु, यावेळी भाजपसमोर राष्ट्रवादीचे आव्हान असणार आहे. दोन्ही पक्ष विजयासाठी समीकरणे कशी असतील, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दरम्यान, शिवाजीराव गर्जे हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे मुंबईचे ऑफिस सांभाळतात. ते आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे.

pawar fadanvis
धक्कादायक! ऑनलाईन गेम खेळण्यास नकार; अल्पवयीन मुलाने केला आईचा खून

राष्ट्रवादीने याआधी रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांची नावे विधान परिषदेसाठी नावे जाहीर केली आहेत. आता त्यात शिवाजीराव गर्जे यांचेही नाव जोडले गेले आहे. तर , भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारती, उमा खापरे, प्रशांत लाड, सदाभाऊ खोत यांची नावे घोषित करण्यात आली आहे. व शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची नावे निश्चित करण्यात आली आहे. तर कॉंग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

pawar fadanvis
पंकजा मुंडेंचे तिकीट कापले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया...

दरम्यान, विधान परिषदेची निवडणूक 20 जून रोजी होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 9 जून आहे. त्यामुळे विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरायला आजचा दिवस शिल्लक आहे. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com