शालेय पुस्तकांमध्ये इंडियाऐवजी भारत नाव लिहा; NCERTकडून शिफारस

शालेय पुस्तकांमध्ये इंडियाऐवजी भारत नाव लिहा; NCERTकडून शिफारस

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात NCERT च्या पुस्तकांमध्ये आता मोठा बदल केला जाणार आहे.
Published on

नवी दिल्ली : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात NCERT च्या पुस्तकांमध्ये आता इंडियाऐवजी भारत लिहिले जाणार आहे. एनसीईआरटीने पुस्तकांमध्ये आवश्यक बदल करण्याबाबत पॅनेलच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. हा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी मांडण्यात आला होता आणि आता तो स्वीकारण्यात आला आहे, असे पॅनेल सदस्यांपैकी एकाने सांगितले आहे.

शालेय पुस्तकांमध्ये इंडियाऐवजी भारत नाव लिहा; NCERTकडून शिफारस
ललित पाटीलला गृहखात्याची साथ आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

इंडियाचे नाव बदलून भारत असे नाव देण्याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. जी-20 कार्यक्रमादरम्यान भारताच्या राष्ट्रपतींच्या नावाने पाठवलेल्या निमंत्रण पत्रात प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असे लिहिले गेले होते. यानंतर इंडियाचे नाव बदलून भारत करावे, अशी चर्चा गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये सुरू झाली होती. अशातच, एनसीईआरटी पॅनलने ही शिफारस केली आहे. याबाबतचा प्रस्ताव एनसीईआरटीच्या सर्व सदस्यांनी एकमताने स्वीकारला आहे.

दरम्यान, सीआय आयझॅक हे इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्च (ICHR) चे सदस्य आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत NCRT आपल्या अभ्यासक्रमात बदल करत आहे. या १९ सदस्यीय समितीमध्ये आयसीएचआरचे अध्यक्ष राघवेंद्र तंवर, जेएनयूच्या प्राध्यापिका वंदना मिश्रा, डेक्कन कॉलेज डीम्ड युनिव्हर्सिटीचे कुलगुरू वसंत शिंदे आणि हरियाणाच्या सरकारी शाळेत समाजशास्त्र शिकवणाऱ्या ममता यादव यांचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com