नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसणार? गणेश नाईक घर वापसी करण्याची शक्यता

नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसणार? गणेश नाईक घर वापसी करण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेला आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेला आहेत. निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत असून अनेकांच्या पक्षप्रवेश होत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या असून गणेश नाईक घर वापसी करण्याची शक्यता आहे. ठाणे आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांचा राजकीय प्रभाव आहे.

गणेश नाईक तुतारी हाती घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून आज सर्व भाजपच्या पदाधिकारी माजी नगरसेवक यांची तातडीची बैठक नवी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली.

या बैठकीमध्ये गणेश नाईक सर्वांशी चर्चा करून पक्षप्रवेशाचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गणेश नाईक काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com