Naseem Khan: महाराष्ट्रात एकही अल्पसंख्याक उमेदवार न दिल्याने नसीम खान नाराज

Naseem Khan: महाराष्ट्रात एकही अल्पसंख्याक उमेदवार न दिल्याने नसीम खान नाराज

काँग्रेस पक्षानं उमेदवारी न दिल्यानं नसीम खान नाराज असल्याची बातमी समोर आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

काँग्रेस पक्षानं उमेदवारी न दिल्यानं नसीम खान नाराज असल्याची बातमी समोर आली आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून नसीम खान हे निवडणुकीसाठी इच्छुक होते. पण त्या जागेवर काँग्रेस पक्षाकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने तयारी करायला सांगितलं आणि वेळेवर उमेदवारी दुसऱ्याला दिली. महाराष्ट्रात एकही अल्पसंख्याक उमेदवार न दिल्याने नसीम खान नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

नसीम खान यांनी महाराष्ट्र प्रचार समिति व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्रातील लोकसभेच्या 3रा, 4था आणि 5 व्या टप्प्याचे स्टार प्रचारक सदस्य पदाचा राजीनामा अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र काँग्रेस कमिटीकडे पाठविला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस (MVA)ने 48 जागे पैकी एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नसल्यामुळे राज्यातील अनेक अल्पसंख्याक संघटना, महाराष्ट्रासह मुंबईतील काँग्रेस नेते, कार्यकर्ते तसेच अल्पसंख्याक समाजामध्ये तीव्र नाराजगी आहे.

महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य असून काँग्रेस पक्षाकडून समाजातील प्रत्येक जाती आणि समाजाला प्रतिनिधित्व दिले जाईल अशी अपेक्षा असते. काँग्रेस पक्षाने सन 2019 पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणुकांमध्ये 1 किंवा 2 अल्पसंख्याक समाजातून लोकसभेकरिता मुस्लिम उमेदवार दिलेला आहे.

यावेळी मुंबईतील 6.50 लाख अल्पसंख्याक आणि 2 लाख हिंदी भाषी बहुल असलेल्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा क्षेत्रातून अल्पसंख्याक समाजाचे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, 4 वेळा आमदार व राज्यात 5 वेळा मंत्री राहिलेले महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांना उमेदवारी देऊन लढविण्याचे 2 महिन्यांपूर्वीच काँग्रेस पक्षाने निश्चित केले होते. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु काल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने उत्तर मध्य मुंबईची उमेदवारी जाहीर केल्याने महाराष्ट्रात विशेषत: अल्पसंख्याक समाजामध्ये तीव्र नाराजगी आहे.

Naseem Khan: महाराष्ट्रात एकही अल्पसंख्याक उमेदवार न दिल्याने नसीम खान नाराज
नांदेडमध्ये मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएम मशीन फोडली; मतदान केंद्रावर बेरोजगार तरुणाचा राडा

नसीम खान यांनी सुद्धा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 48 पैकी 1 ही अल्पसंख्याक उमेदवार दिला नसल्यामुळे तीव्र नाराजगी दाखवत महाराष्ट्र प्रचार समिती व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्रातील लोकसभेच्या 3रा, 4था आणि 5व्या टप्प्याचे स्टार प्रचारक सदस्य पदाचा राजीनामा अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र काँग्रेस कमिटीकडे पाठविला आहे. यामागचे कारण सांगत असताना नसीम खान म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून कमजोर परिस्थितीतही पक्षाने दिलेल्या सर्व आदेशाचे कठोर पालन मी करत आलो आहे, पक्षाने मला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि महाराष्ट्र येथे पक्षाचा प्रचार-प्रसार करण्याची जी-जी जबाबदारी दिली होती ती पण मी पूर्ण इमानदारीने पार पाडली. परंतु या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस (MVA)ने 48 जागांपैकी एक ही अल्पसंख्याक उमेदवार दिला नसल्याने प्रचारा दरम्यान अल्पसंख्याक समाजाने महाराष्ट्रात काँग्रेसने एकही अल्पसंख्याक उमेदवार का नाही देऊ शकले? अशा व इतर प्रश्नाचे उत्तर देण्यास माझ्याकडे शब्दच नसल्याने मी प्रचारात भाग घेऊ इच्छित नाही असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com