शुगर वाढल्यामुळे ऑपरेशन...; म्हणून अजित पवारांची तलवार म्यान?
मुंबई : राज्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. या चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम दिला असून माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकाऱ्यांबद्द्ल गैरसमज निर्माण करण्याचे काम सुरु आहे. बातम्यांमध्ये काही तथ्य नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. यावर मात्र शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिलेल्या प्रतिक्रियने संभ्रम वाढवला आहे.
अजित पवारांची शुगर वाढल्यामुळे ऑपरेशन पुढे ढकलला गेले आहे, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. सामना रोखठोकमधून संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याचे पण अजित पवार यांनी खंडन केलं नाही. अजित दादा नाराज आहेत हे स्पष्ट होत आहे. कॉल वज्रमूठ आहे. आज अजित दादांनी झाकली मूठ सव्वा लाखाची आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
अजित दादांनी यशस्वी उपमुख्यमंत्री होते. ५६ आमदार असणाऱ्यांना महत्व की १५ आमदार असणारे महत्वाचे जास्त. नेता कोण तर ज्याच १५ आमदार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार पण चर्चा करत आहेत आमचे ५६ आमदार असून आम्हाला किंमत नाही. महविकासा आघाडीत अजित पवार यांची गळचेपी होत आहे. काही दिवसात या गोष्टी घडतील. वज्रमूठ आहे की सैल झालेली मूठ आहे हे सर्वांनी पाहिलं आहे. अजित दादांनी आज अप्रत्यक्षरित्या उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला, असेही नरेश म्हस्के म्हणाले.
अजित पवार यांच्या स्वागतासाठी आम्ही तयार आहोत. त्यांचा योग्य तो मानपान केला जाईल. बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अजित पवार मातबार नेते असताना कोणत्या नेत्याला आवडणार आहे १५ आमदार असणारा नेता म्हणून का छाताडावर घेतील? काहीतरी जळतंय म्हणून धूर येतो, असे संकेत त्यांनी दिले आहेत.