Narendra Modi: वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोंदींचा विजय

Narendra Modi: वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोंदींचा विजय

नरेंद्र मोदी हे अवघ्या दीड लाख मताधिक्याने विजयी झाले आहेत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेची सात टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. इंडिया आघाडी विरुद्ध महायुती असा राजकीय संघर्ष राज्यासह देशभरात पाहायला मिळत आहे. अशातच लोकसभेचा आजचा निकाल पाहण्याची देशभरातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. नरेंद्र मोदी यांना वाराणसी मतदारसंघातून विजयी झाले असले तरी यंदा त्यांचा विजय कमी मताधिक्याने झाल्याचे समोर आले आहे. यंदा नरेंद्र मोदी हे अवघ्या दीड लाख मताधिक्याने विजयी झाले आहेत.

2014 ला पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशमधून वाराणसी मतदारसंघाची निवड केली होती. त्या मतदारसंघातून 2014 ला त्यांना 5,81,022 मतं मिळाली होती. त्यावेळी त्यांनी आपचे अरविंद केजरीवाल यांचा तब्बल 3 लाख मतांनी पराभव केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com