नारायण राणेंची शरद पवारांना धमकी म्हणाले,- घर गाठणे कठिण होईल
Narayan Rane Sharad Pawar : गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोना संकटावर मात करण्यासाठी आरोग्य खात्यानं उत्तम कामगिरी केली. हे सर्व पाहिल्यानंतर हा प्रयोग फसलाय म्हणणं, याचा अर्थ राजकीय अज्ञान आहे. विधानसभेचे सभासद इथे आल्यानंतर, त्यांना ज्या पद्धतीनं नेलं ती सर्व वस्तुस्थिती लोकांना सांगतील, त्यानंतर बहुमत सिद्ध होईल अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Narayan Rane's threat to Sharad Pawar)
यावर बोलताना भाजपा नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी शरद पवार यांना धमकी दिली आहे. माननीय शरद पवार (Sharad Pawar) साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.
तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजप नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं. अजित पवारांना स्थानिक माहिती आहे, पण गुजरात आणि आसाममधील परिस्थिती आम्हाला जास्त माहित आहे. एकनाथ शिंदे यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा आपल्याला पाठिंबा असल्याचं सांगितलं. त्यानुसार देशात सहा राष्ट्रीय पक्ष असून भाजप सोडून इतरांचा त्यांच्यामागे हात आहे का याचा विचार करावा. गुजरात आणि आसामला ज्या लोकांनी शिंदेची व्यवस्था केली ते अजित पवारांच्या परिचयाचे नाही, ते माझ्या परिचयाचे आहेत. त्यामुळे मला त्याची माहिती आहे."