काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते संभ्रम निर्माण करताहेत; भास्कर जाधवांच्या विधानाला पटोलेंचे प्रत्युत्तर, म्हणाले...

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते संभ्रम निर्माण करताहेत; भास्कर जाधवांच्या विधानाला पटोलेंचे प्रत्युत्तर, म्हणाले...

भास्कर जाधवांच्या विधानामुळे महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे आहेत का? याची चर्चा सुरु झाली आहे. यावर आता नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

उदय चक्रधर | भंडारा : महाविकास आघाडीबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते संभ्रम निर्माण करत आहेत, असे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. जाधवांच्या विधानामुळे महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे आहेत का? याची चर्चा सुरु झाली आहे. यावर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी पुढे चालेल आणि आम्ही टिकून राहू, असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी भास्कर जाधवांना दिले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते संभ्रम निर्माण करताहेत; भास्कर जाधवांच्या विधानाला पटोलेंचे प्रत्युत्तर, म्हणाले...
लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी; मुंडे, खडसेंवर महत्वाची जबाबदारी

नाना पटोले म्हणाले की, कुणी चुकीचा अर्थ लावत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. मूळ प्रश्न आहे की, आम्ही काहीच बोललो आहे. माध्यमांच्या चुकीच्या बातम्या आणि त्याचा चुकीचा अर्थ लावून गैरसमज निर्माण केला जात असेल तर ते चुकीचे आहे. जागा वाटपाचं झालेला नाही, त्यासाठी कमिटी बनणार आहे. राहिलं लोकल बॉडी निवडणूक बद्दलची भूमिका. ती आजची नाही, वर्षभरापूर्वीच आहे. ती भूमिका सर्वांचीच आहे. त्यामुळं कुणी गैरसमज करून घेवू नये. महाविकास आघाडी पुढे चालेल आणि आम्ही टिकून राहू, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

तर, अकोला इथं मी उद्या जाणार आहे. सगळ्या लोकांना मी भेटणार आहे. मृत्यू झालेल्यांच्या घरी जावून भेट देणार आहे. जिथे घटना होते, तेथील कारणमीमांसा जवळ जावून बघितल्यास अधिक स्पष्टता होईल. म्हणून मी उद्या अकोल्याला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

काय म्हणाले होते भास्कर जाधव?

चार दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची एक बैठक पार पडली. यात जो धोरणात्मक निर्णय झाला त्यापेक्षा नाना पटोले आणि जयंत पाटील यांनी आपल्या मुलाखती देताना घेतलेली भूमिका वेगळी आहे. हे लोक संभ्रम निर्माण करु पाहात आहेत, असे भास्कर जाधव यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com