महाविकास आघाडीमध्ये उध्दव ठाकरेंची ताकद कमी झाली म्हणून...; नाना पटोलेंचे विधान
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस सुनावणी झाली. मंगळवारी आता पुढील सुनावणी होणार आहे. यादरम्यान, न्यायालयाने ठाकरे गटाबद्दल मोठे निरीक्षण नोंदविले आहे. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ही त्यांची चूक असल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे. तसेच, ठाकरे गटाने राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.
सरकार राज्यपालांनी पाडलं तो युक्तिवाद बरोबर आहे. शिंदे आणि फडणवीस यांना कोणतेही निमंत्रण न देता सरकार स्थापन केले. असंवैधानिक शपथ ही दिली गेली आहे. राज्यपालांच्या कार्यकाळात जे निर्णय घेतले त्याची चौकशी व्हावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. फडणवीस विरोधात कट रचल्याचे मी कुठेही बोललो नाही. काँग्रेसमध्ये जशी भांडण लावली जातात तसे भाजपमध्ये देखील आहेतच. राज्यात महागाई बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याकडे लक्ष द्यायला हवं, असे नाना पटोलेंनी म्हंटले आहे.
महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठाची ताकद कमी झाली म्हणून बार्गेनिंग पॉवर कमी होईल असं काही नाही. आम्हाला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे. देशाच्या संपत्तीला लुटणाऱ्यांना आम्हाला थांबवायचे आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते पद याबाबत तिन्ही पक्ष मिळून आम्ही निर्णय घेऊ. याबाबत विश्लेषण करावा हे आता बरोबर नाही. मात्र, त्यावेळेस जी परिस्थिती येईल त्यानुसार आम्ही चर्चा करू, अशी माहिती त्यांनी दिली आहे.