कोणाच्या बायकोविषयी लिहीलं की लगेच पकडतात, पण राष्ट्रपित्यांबाबत...; पटोलेंचा टोला

कोणाच्या बायकोविषयी लिहीलं की लगेच पकडतात, पण राष्ट्रपित्यांबाबत...; पटोलेंचा टोला

महात्मा गांधींबाबत संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन विरोधकांनी कारवाई करण्याची मागणी करत आहेत. याचवरुन नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
Published on

मुंबई : महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. या विधानावरुन विरोधक आता आक्रमक झाले असून संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. याचवरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

कोणाच्या बायकोविषयी लिहीलं की लगेच पकडतात, पण राष्ट्रपित्यांबाबत...; पटोलेंचा टोला
ठाकरे गट तर मुंबईत बैलगाडीतून फ‍िरा असेही सांगेल; शेलारांचा टोला

संभाजी भिडे हे भाजपचा पिल्लू आहे. महाराष्ट्राच्या महापुरुषांना बदनाम करणे हा त्यांचा अजेंडा आहे. राज्यातील भाजपा सरकार हे संभाजी भिडे यांच्या पाठीशी आहे, असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. तर, कालच आम्ही सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात ज्यांनी आक्षेपार्ह लिहिले त्यांच्या विरोधात कारवाई करा, अशी मागणी केली होती. मात्र, सरकार सांगत आहे की सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात लिहणारा सापडत नाही. कोणाच्या बायको विषयी काही लिहीले की लगेच पकडतात. पण, राष्ट्रपित्यांबाबत काही बोलले सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत चुकीचे बोलले तर मात्र काहीच कारवाई होत नाही, असा जोरदार टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला आहे. गृहमंत्री नेमकं काय करत आहेत, असा सवानही पटोलेंनी उपस्थित केला.

विरोधी पक्षनेत्याबद्दल बोलताना ते म्हणाले, सध्या सर्वधिक आमदारांची संख्या काँग्रेसकडे आहे आणि म्हणून पुढच्या आठवड्यात विरोधी पक्ष नेता घोषित केला जाईल. प्रत्येक पक्ष आपापला गृहपाठ करत आहे. निवडणूक प्रक्रियेला अजून वेळ आहे. याबत आम्ही अनेक बैठका घेतल्या आहेत. चर्चा केली आहे. अनेक सर्वे घेतले आहे. ज्या ठिकाणी जो आमदार पक्ष मजबूत असेल त्यांचा जास्त प्रायरिटी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नाना पटोले यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. याबाबतही पटोलेंनी माहिती दिली. १५ ऑगस्टनंतर INDIAची बैठक मुंबईत होणार आहे. त्याची तयारी संबंधित बैठक घेण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. INDIA चे सर्व नेते मुंबईतील बैठकीत उपस्थित राहतील याबाबत चर्चा केली. त्यादृष्टीने तयारी करण्यात येणार आहे. भाजपा देशाला बर्बाद करत आहे. म्हणून ही लढाई भाजपा विरोध INDIA आहे. या देशाला गरीब करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे, अशी जोरदार टीकाही पटोलेंनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com