राजकारण
पंतप्रधानपदाची संधी वाढल्याने नितीन गडकरी उभे राहिलेत; नाना पटोलेंच्या विधानाने चर्चांना उधाण
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काल वर्धा येथे होते.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काल वर्धा येथे होते. काँग्रेसची जनसंवाद यात्रा वर्ध्यातील आर्वीत पोहचली आहे. यावेळी नाना पटोले बोलत होते. नाना पटोले यांनी यावेळी एक वक्तव्य केलं. त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आलं आहे. नाना पटोले म्हणाले की, पूर्वी गडकरी काय बोलायचे आणि आता काय बोलत आहेत, हे बारकाईने पाहा. पूर्वी गडकरी म्हणायचे तलावात विमान उतरवेल, हवेत बस उडवेन. आता गडकरी म्हणतात 50 खासदार कमी पडले तर मी प्रधानमंत्री बनेल, आता संधी दिसताच गडकरी उभे झाले आहेत. यामुळे मोदी आणि गडकरी यांचा वाद सुरू झालाय. असे नाना पटोले म्हणाले.