पाच राज्यात काँग्रेसच विजयी होणार; नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास

पाच राज्यात काँग्रेसच विजयी होणार; नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. यावर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

मुंबई : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. काँग्रेस पक्षाला या पाचही राज्यात जनतेचे मोठे समर्थन लाभले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी या राज्यात झंझावाती प्रचार केला. पाचही राज्यातील वातावरण काँग्रेस पक्षासाठी अनुकूल आहे, त्यामुळे काँग्रेस पक्ष या पाचही राज्यात बहुतमाने निवडून येईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

पाच राज्यात काँग्रेसच विजयी होणार; नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास
Exit Poll Live : 5 राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी; BJP vs Congress लढतीत कुणाची सरशी?

नाना पटोले म्हणाले की, राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे, हे वर्ष शेतकऱ्याचे मोठे नुकसान करणारे ठरले आहे. नैसर्गिक संकटात अडकलेला शेतकरी सरकारकडे मदतीची आशा लावून बसलेला असताना भाजपा सरकार मात्र केवळ घोषणाबाजी व जाहिरातबाजी करत आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केवळ कोरड्या घोषणा करण्यात आल्या. आता मंत्री नुकसानीचा दौरा करत आहेत, हा केवळ देखावा आहे. मंत्र्यांनी दौरे करावेत पण आधी शेतकऱ्याच्या हातात भरीव मदत द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यात मागील काही महिन्यांपासून आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजपानेच आरक्षणाचे आश्वासन दिले होते पण आता ते आरक्षण देण्यास चालढकल करत आहेत. आरक्षण प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाजात जाणीवपूर्वक भांडणे लावली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंक लावण्याचे काम भाजपा करत आहे. आरक्षण प्रश्नावरून मंत्रीमंडळातील मंत्र्यांची भांडणे ही सुद्धा सरकारचा ठरवून सुरु असलेला कार्यक्रम आहे. ही सर्व नौटकी सुरु असून राज्यातील जनतेला हे माहित आहे. सर्व जातींना आरक्षण मिळाले पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे, त्यासाठी जातनिहाय जनगणना केली पाहिजे पण भाजपा सरकार ही जनगणना करत नाही, अशी टीकाही नाना पटोलेंनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com