पुणे मतदारसंघ कॉंग्रेसचा का राष्ट्रवादीचा? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
मुंबई : पुण्यात भाजप नेते गिरीश बापटांच्या निधनाने लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. परंतु, या जागेवर पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच महाविकास आघाडीत चढाओढ पाहायला मिळत आहे. या जागेवर राष्ट्रवादी नेते अजित पवारांनी दावा केला आहे. तर कॉंग्रेसचा मतदार संघ असल्याने कॉंग्रेस नेत्यांनीही याच जागेवर लढण्याचा निर्धार केला आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले म्हणाले की, पुण्याचा जागा मेरीटवरती होईल. आम्ही लढणार आहे. या संदर्भात निर्णय होईल. संजय राऊत तेच म्हणत आहे की कसेल त्याची जमीन. म्हणजे मेरीट वरती निर्णय झाला पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे. अजितदादा यांना धन्यवाद देतो की त्यांनी या भुमिकेला समर्थन दिलेलं आहे. मेरीट कोणाच आहे हे सिद्ध होईल. वाद होणार नाही. आम्ही बसून निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवल्याच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा अवमान केला. महिलांचाही अवमान केला. त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.