हे मलाईसाठी एकत्र; नाना पटोलेंचा घणाघात, जनतेच्या घामाचा पैसे...
मुंबई : पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला आहे. पुण्याच्या पालकमंत्रीदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली असून अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहे. अशातच, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
नाना पटोले म्हणाले की, या सरकारमध्ये गोंधळ आहे. एकमेकांना सगळे ओढत आहेत. कधी नव्हे ती परिस्थिती अशी झाली आहे. हे मलाई साठी एकत्र आले आहेत. राज्याच्या जनतेच्या घामाचा पैसे लुटणं हे सुरु आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.
राज्यात सध्या दुष्काळाची स्थिती आहे. मंत्रिमंडळात जे चित्र पाहिलं त्यावर आम्ही बैठकीत चर्चा केली. या सगळ्या घटनेबाबत आम्ही बोललो. या घटनेकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही. महाराष्ट्रसाठी हे दुर्दैव आहे. हे खुनी सरकार आहे का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
तर, जागावाटपाबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले, आम्ही आढावा घेतला आहे. मेरिटच्या आधारावर चर्चा केली जाईल. कोणाला कमी किंवा जास्त हा विचार नंतर केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.