Nana Patole : आम्हाला दुसऱ्याच्या घरात वाकुन पाहण्याची सवय नाही
उदय चक्रधर | भंडारा : आम्हाला दुसऱ्याच्या घरात वाकून पाहण्याची सवय नाही, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भंडाऱ्यात केले आहे. शिवसेनेचे (Shivsena) बारा खासदार शिंदे गटात (Shinde Group) जात असल्याच्या प्रश्नाबाबत त्यांनी हे विधान करत अधिक भाष्य करणे टाळले.
नाना पटोले म्हणाले की. काँग्रेसची लोकांच्या घरात वाकून पाहण्याची सवय नाही. शिवसेनेत काय चालू आहे आम्ही लक्ष देत नाही. आमचे लक्ष केवळ जनतेच्या प्रश्नाकडे आहे. सध्या भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती आली असून आमचे लक्ष सध्या पूर परिस्थितीकडे आहे. मात्र, शिवसेनेचे बारा खासदार शिंदे गटासोबत गेले या विषयावर बोलणे टाळले.
तसेच, महाविकास आघाडी सरकार तीन चाकी सरकार होते. मात्र. समन्वयाचा अभाव असल्यामुळें हे सरकार कोसळल्याचे वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केले होते. त्याच्याच समाचार पटोलेंनी भंडाऱ्यात घेतला असून अनिल बोंडे यांच्या बोलण्यात समन्वय नसल्याचे टोला नाना पटोले यांनी लावलेला आहे. त्यांच्याविषयी काय बोलावे आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्वाचे असल्याचे नाना पटोले म्हणत बोंडे यांच्या वक्तव्यावर दुर्लक्ष केले आहे.
दरम्यान, आमदारांनंतर आता शिवसेनेच्या 12 खासदारही शिंदे गटात सामील झाले आहेत. या खासदारांनी संसदेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्याचा हालचाली सुरु केल्या आहे. लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात दोन तृतीयांशपेक्षा जास्त खासदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कार्यालय मिळण्याची मागणी केली आहे