Nana Patole
Nana PatoleTeam Lokshahi

Nana Patole : कॉंग्रेसला बदनाम करण्याचा भाजपचा धंदा

राहुल गांधींच्या चौैकशीवरुन नाना पटोले यांची भाजपवर टीका
Published on

मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समोर हजर झाले आहेत. दरम्यान, राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसतर्फे (Congress) आज देशभरातील ईडीच्या २५ कार्यालयांबाहेर निदर्शने केली जाणार आहेत. ही भ्याड कारवाई आहे, अशा शब्दात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Nana Patole
काय सांगता! पुण्यात वाहतूक पोलीस दंड आकारणार नाहीत

नाना पटोले म्हणाले की, २०१४ पासून अत्याचारी भाजप सरकार आले आहे. त्या विरोधात आमची लढाई आहे. गांधी परिवाराने देशाला घडवले असून सर्वसामान्य माणूस हा गांधी परिवारासोबत आहेत. तर, डाकू आणि चोरांची चौकशी केली जाते. पण, हे गांधी परिवाराची चौकशी करत आहेत. मोदी सरकार आल्यावर बोफोर्स प्रकरणात राजीव गांधी निर्दोष आहेत, असे म्हंटले होते.

मोदी सरकार कायम नेहरू गांधी परिवाराला टार्गेट करतात. हा आम्हाला बदनाम करण्याचा भाजपचा धंदा आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

Nana Patole
Nilesh Rane : आज पेंग्विनचा वाढदिवस तर उद्या सुशांतचा मृत्यूदिन

दरम्यान, राज्यसभेप्रमाणेच विधानपरिषदेतही भाजपने एक अतिरिक्त उमेदवार उतरविला आहे. या पार्श्वभूमीवर आमच्या जवळ मतं जास्त आहे. भाजपकडे पुरेसे मत नाही. कॉंग्रेसची भूमिका ही विधानपरिषद निवडणुका बिनविरोध करण्यासाठीची आहे, असे नाना पटोले यांनी म्हंटले आहे.

Nana Patole
Chandrakant Patil : लिहून ठेवा 2024 ला विधानसभेला 170 जागा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com