Nana Patole
Nana Patole Team Lokshahi

Nana Patole : पंतप्रधानांनी जाहीर माफी मागायला हवी

नुपूर शर्मा यांच्या 'त्या' वक्तव्यवरुन नाना पटोलेंची भाजपवर टीका
Published on

मुंबई : भाजप नेते नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि नवीन जिंदाल (Naveen Jindal) यांनी प्रेषित मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर इस्लामिक देशांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे

Nana Patole
विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर, आमशा पाडवी यांची नावं निश्चित?

नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसनं वारंवार केंद्र सरकारला सूचित केलं होतं की संविधानातील तत्वांचे पालन करायला हवे. धर्मांध व्यवस्था निर्माण करुन मूळ मुद्दे बाजुला सारणं ही भाजपची नीती आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

ते म्हणाले की, मुस्लिम धर्मातील पैगबरांविषयी जे वक्तव्य करण्यात आले. त्याचा परिणाम देशाचे आखाती देशांशी संबंध व आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर झाला. आता ते संविधानाची भाषा बोलता आहेत. मात्र, या प्रकरणावर पंतप्रधानांनी जाहीर माफी मागायला हवी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे.

Nana Patole
मुख्यमंत्र्यांची औरंगाबाद सभा ठरणार सुपर स्प्रेडर?

दरम्यान, भाजप नेते नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा पाकिस्तान, सौदी अरेबिया, कतार, कुवेत आणि इराणने निषेध केला आहे. यानंतर भारतीय जनता पक्षाने आपल्या दोन्ही नेत्यांविरोधात कठोर पावलं उचलली असून दोन्ही नेत्यांनी आपली वक्तव्येही मागे घेतली आहेत.

Nana Patole
Gopichand Padalkar : वय झाले असेल तर शरद पवारांनी घरी बसावे
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com