Nana Patole
Nana PatoleTeam Lokshahi

अंधेरी पोटनिवडणूकीत काँग्रेस पूर्ण ताकतीने प्रचार करणार, काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका

महाविकास आघाडी मध्ये ज्या निवडणूका लागतील आणि ज्या पक्षाचा उमेदवार उभा राहिलं त्याला आम्ही पाठिंबा देऊ, मित्र अडचणीत आला तर त्याला मदत करणे हाच आमचा धर्म आहे
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात सध्या अभूतपुर्व गोंधळ सुरू असताना, नुकताच निवडणूक आयोगाने तात्पुरता स्वरुपात शिवसेनेचे चिन्हं गोठवले आहे. या सर्व घडामोडी दरम्यान अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. राजकीय घडामोडी पाहता ही पोटनिवडणूक अतिशय अटीतटीची ठरणार आहे. यावरच आता सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेला या निवडणुकीत पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. दरम्यान, काँग्रेस याबाबत भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र, आता काँग्रेसने याबाबत भूमिका स्पष्ट केली असून, या निवडणुकीत काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणार आहेत, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

Nana Patole
धनुष्यबाण चिन्ह गोठवलं! संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

माध्यमांशी बोलत असताना नाना पटोले यांना अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असेल? असा प्रश्न विचारला असता त्यावर बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी मध्ये ज्या निवडणूका लागतील आणि ज्या पक्षाचा उमेदवार उभा राहिलं त्याला आम्ही पाठिंबा देऊ. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणार आहे. भाजपला गप्प करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. मित्र अडचणीत आला तर त्याला मदत करणे हाच आमचा धर्म आहे, काँग्रेस पूर्ण ताकतीने प्रचार करणार आणि सेनेला मदत करू. मात्र स्थानिक स्वराज संस्था आम्ही स्वबळावर लढवू असेही यावेळी नाना पटोले म्हणाले.

Nana Patole
संजय राऊतांना दिलासा नाहीच; कोठडी पुन्हा वाढली

पुढे भाजपावर निशाणा साधताना पटोले म्हणाले की, देशाच्या लोकशाहीत सत्य कधीही पराजित होऊ शकत नाही. भाजपाने असत्याच्या मार्गाने सत्ता घेतली. भाजपा इतर राजकीय पक्षांना संपवण्याचे तसेच देशाचा नाश करण्याचे काम करत आहे. हे जास्त काळ चालू शकणार नाही, असेही पटोले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com