मोठी बातमी! राज्यातील महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये? फडणवीसांचे संकेत

मोठी बातमी! राज्यातील महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये? फडणवीसांचे संकेत

राज्यातील महापालिकेच्या निवडणुका लावण्याची मागणी विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहे.
Published on

पुणे : राज्यातील महापालिकेच्या निवडणुका लावण्याची मागणी विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहे. अशातच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या निवडणुकींचे संकेत दिले आहेत. पहिली लढाई मनपाची ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचे संकेत फडणवीसांनी दिले आहे.

मोठी बातमी! राज्यातील महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये? फडणवीसांचे संकेत
मविआची वज्रमूठ ढिल्ली; विखे-पाटलांचा घणाघात, जागेसाठी एकमेकांवर मुठ उभारल्याशिवाय राहणार नाहीत

पुणे शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन तसेच घर चलो संपर्क अभियानचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, पुणे भारतीय जनता पक्षाचा गड आहे. गिरीश बापट, मुक्ता टिळक आमच्यातून निघून गेल्या. त्यांची पोकळी आम्हाला जाणवेल. परंतु, आपला कार्यकर्ता संघर्षातून पक्ष बळकट करेल, असे त्यांनी म्हंटले आहे. कर्नाटकातील निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही. महापालिका असो, विधानसभा, लोकसभा सगळीकडे आपलीच सत्ता येणार. पहिली लढाई मनपाची ऑक्टोबर-नोव्हेंबर माहित नाही, असे म्हणत फडवीसांनी संकेत दिले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तर, राज्यपालांच्या भूमिकेवरही ताशेरे ओढले होते. तर, दुसरीकडे विरोधकांकडून सातत्याने महापालिकेच्या निवडणुका लावण्याची मागणी करण्यात येत होती. यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर अनेकदा शाब्दिक हल्लाही करण्यात आला होता. अखेर फडणवीसांनी पालिका निवडणुकीचे संकेत दिल्याने आता राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com