मुक्ताईनगरच्या भाजप नगराध्यक्षाच्या अपात्रेला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; नेमके काय आहे प्रकरण?

मुक्ताईनगरच्या भाजप नगराध्यक्षाच्या अपात्रेला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; नेमके काय आहे प्रकरण?

जात वैधता प्रमाणपत्राबाबत पुढील सुनावणी होईपर्यंत नजमा तडवी यांच्या अपात्रतेला स्थगिती
Published on

मंगेश जोशी | जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा नजमा तडवी यांनी वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने नजमा तडवी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी नजमा तडवी यांच्या अपात्रतेवर स्थगिती दिली आहे. जात वैधता प्रमाणपत्राबाबत पुढील सुनावणी होईपर्यंत नजमा तडवी यांच्या अपात्रतेला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली आहे.

मुक्ताईनगरच्या भाजप नगराध्यक्षाच्या अपात्रेला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; नेमके काय आहे प्रकरण?
मुंबई लोकलचा रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर 'मेगाब्लॉक'

मुक्ताईनगर नगराध्यक्ष पद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने नजमा तडवी यांनी भाजपकडून निवडणूक लढवून लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या. परंतु, सुधारित निर्देशानुसार एक वर्षाच्या आत आपली जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, नजमा तडवी यांनी ते न केल्याने याप्रकरणी गिरीश रमेश चौधरी यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे यांना अपात्र करण्याबाबत अपील सादर केले होते.

या अपीलावर तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 8 नोव्हेंबर 2021 रोजी नजमा तडवी यांना अपात्र ठरवले होते. याप्रकरणी नजमा तडवी यांनी आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून तसेच मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी नजमा तडवी यांच्या अपात्रतेला स्थगिती दिली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे 7 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, नजमा तडवी यांच्यावर झालेली अपात्रतेची कारवाई ही राजकीय दबावामुळे झाल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी विधानसभेत केला होता. त्यानंतर काही दिवसांमध्येच नजमा तडवी यांच्या अपात्रतेला स्थगिती मिळाल्याने विरोधकांना देखील मोठा धक्का मानला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com