ईडी कारवाई करणार असेल तरच यावे अन्यथा येऊ नये, खासदार उदयनराजेंचं ईडीला आव्हान

ईडी कारवाई करणार असेल तरच यावे अन्यथा येऊ नये, खासदार उदयनराजेंचं ईडीला आव्हान

Published by :
Published on

राज्यातील राजकारण सध्या ईडीच्या कारवायांवरुन तापले आहे. राज्यात आघाडीच्या मंत्र्यांवर आणि नेत्यावर सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईवरून अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब अशा अनेक नेत्यांची चौकशी सध्या ईडीकडून केली जात आहे.

दरम्यान, ईडीने कारवाई करताना ती माध्यमांसमोरच झाली पाहिजे असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ईडी कारवाई करणार असेल तरच यावे अन्यथा येऊ नये. नाहीतर परत यांचा, त्यांचा फोन आला म्हणून सांगतील, यायच असेल तर सर्व प्रसारमाध्यमांसमोर या आणि सांगा. नाहीतर उगाच द्वेषापोटी राजकारण झालं अशी आरडाओरड होऊ नये," असं थेट आव्हानच उदयनराजेंनी दिले आहे.

ईडीच्या कारवाईवर भाष्य करताना उदयनराजे भोसले यांनी भाजपलाही घरचा आहेर दिला होता. एकमेकांचे झाकायचे आणि सोयीप्रमाणे काढायचे अशा शब्दांत त्यांनी भाजपसहित इतर पक्षांवरही टीका केली होती. ईडी आपल्याकडे आली, तर सर्वांचीच यादी देतो, असेही ते यावेळी म्हणाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी आव्हान दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com