MNS Workers reading Hanuman Chalisa during Azaan
MNS Workers reading Hanuman Chalisa during AzaanVikas Mane

अजान सुरू असतानाच बीडमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांकडून हनुमान चालीसाचे वाचन

Published by :
Vikrant Shinde
Published on

विकास माने

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणात मशिदीवर भोंगे लावल्यास त्यांच्या समोर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावण्यात येईल असे वक्तव्य केले होते. त्यानंतर मुंबईतील विविध मनसे कार्यालयासमोर (MNS Party Office) हनुमान चालीसा लावण्यात आली होती.

MNS Workers reading Hanuman Chalisa during Azaan
Watch Video; पुणे तिथे काय उणे?; थेट हेलिकॉप्टरमधून आणलं नवजात बाळाला घरी

आता हे लोण बीड पर्यंत पोहचले असून बीडमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी वैष्णो देवी मंदिरासमोर अजान (Azaan) सुरू असताना हनुमान चालीसा भोंग्यावर लावण्यात आली. बीडमध्ये अजान सुरू असतानाच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भोंगा लावून चालीसा लावला आहे, त्यामुळे बीडमध्ये (Beed) तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत सरकार निर्णय घेणार नाही तोपर्यंत हनुमान चालीसाचे भोंगे सुरूच राहतील असा पवित्रा मनसेनी घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com