Raj Thackeray
Raj ThackerayTeam Lokshahi

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कोकणात सभा; या नेत्यांवर असणार जबाबदारी

६ मे रोजी कोकणात राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

निसार शेख | रत्नागिरी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 6 मे रोजी कोकण दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान राजठाकरेंची त्या ठिकाणी जाहीर सभा देखील होणार आहेत. विशेष म्हणजे एकाच दिवशी दोन ठाकरे बंधूंची कोकणात सभा होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाड तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची रत्नागिरी किंवा मालवण याठिकाणी होणार आहे. मात्र ठिकाण अद्याप ठरलेल नाही मात्र दोन्ही जाहीर सभेची उत्सुकता उभ्या महाराष्ट्राला लागून राहिली आहे.

राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात नेमकं काय घडामोडी घडणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. राज ठाकरेंनी डिसेंबर महिन्यात झालेल्या कोकण दौऱ्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले होते तसेच ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्यांनी मला सांगा काही बदल मला करावेच लागतील असे थेट सुतोवाच त्यांनी केले होते. दापोलीच्या बैठकीत ही त्यांनी खडे बोल सुनावत इकडे काही खट्ट जरी वाजलं तरी मला त्याचा मुंबई धडाम असा आवाज येईल अशी तंबीच त्यांनी इथल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत दापोलीत दिली होती.

मनसेची कोकणातील जबाबदारी त्यांनी दोन नेत्यांवरती देण्यात आली आहे. शिरीष सावंत व अविनाश जाधव यांच्यामध्ये कोकणातील मनसेची जबाबदारी देण्यात आली होती.हे दोन नेते मला कोकणातील सगळ्या परिस्थितीचा अहवाल देतील आणि त्यानंतर मी योग्य ते आवश्यक वाटल्यास बदल करेन असेही दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनी म्हटले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरेंचा सहा मे रोजी होणाऱ्या कोकण दौऱ्याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. राज ठाकरे या दौऱ्यात काही बदल करतात का व ते जाहीर सभेत नेमकी कोणती भूमिका मांडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोकणात अनेकजण काम करण्यासाठी इच्छुक आहेत पण काही लोकांमुळे ते पक्षापासुन लांब आहेत असे खडे बोल सुनावत आशा लोकांना मी बाहेर काढून मला आता काही बदल मला कोकणात करावेच लागतील असे सांगत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या बैठकीत राज ठाकरेंनी दिलेला हा इशारा नक्की कोणत्या पदाधिकाऱ्यांसाठी होता असा प्रश्नही उपस्थित झाला होता.   ही नाराजी व्यक्त करताना कोकणातली जबाबदारी दोन महत्वाच्या नेत्यांवर देण्यात येत असल्याच जाहीर केले. अविनाश जाधव याना इकडे लक्ष घालण्याचे थेट आदेशच राज ठाकरेंनी दापोलीतील बैठकीत दिले होते. अविनाश जाधव हे मुळचे कोकणातले दापोली तालुक्यातील वाकवली येथील आहेत. तर नारकर हे राजापूर येथील आहेत. यावेळी उपस्थित असलेले कोकणातले रत्नागिरी जिल्हासंपर्क अध्यक्ष सतीश नारकर,ठाणे पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यावर मी कोकणातली जबाबदारी देतोय असे जाहीर केले होते त्यांच्याकडून काही  दिवसात मला रिपोर्ट मिळतील आणी त्यानंतर काही बदल मला करावेच लागतील अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरे यांनी मांडली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com