Raju Patil | Eknath Shinde
Raju Patil | Eknath Shindeteam lokshahi

राजू पाटलांचा सरकारला इशारा, म्हणाले हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा दिला याचा अर्थ...

ठाण्याचे मुख्यमंत्री असताना खड्डे भरले जावेत हीच अपेक्षा
Published by :
Shubham Tate
Published on

Raju Patil : कल्याण ग्रामीण भागातील रखडलेली रस्त्यांची कामे रस्त्यांची झालेली दुरावस्था याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष केलं. याबाबत बोलताना आमदार पाटील यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा दिला याचा अर्थ असं नाही जे चाललंय ते सर्वच आम्ही खपवून घेऊ. जिथे अन्याय दिसेल तिथे आम्ही बोलणार आमच्या पद्धतीने प्रश्न मांडणार असा इशारा सरकारला दिलाय. (MNS MLA Raju Patil criticized the Eknath Shinde government)

शिंदे फडणवीस सरकारला मंत्रीमंडळ विस्तरावरून आज मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट द्वारे खोचक सवाल केला होता. सरकारच्या बाजूने मतदान करणारे मनसे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. या ट्विटनंतर आता मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातील रखडलेले रस्ते व रस्त्यांची दुरावस्था याबाबत पुन्हा एकदा सरकारला लक्ष केलं.

Raju Patil | Eknath Shinde
IRCTC : तिकीट बुक करताना तुम्हाला फक्त एका क्लिकवर मिळणार 10 लाखांचा लाभ

रखडलेली रस्त्यांची कामे व रस्त्यांची दुरावस्था, रस्त्यांवर पडलेले खड्डे याबाबत राजू पाटील यांना विचारलं असता त्यांनी एम आय डी सी भागात रस्त्यांच्या कामे सुरू व्हावीत यासाठी बॅनर फाडले , उलटे लावून झाले तरी कामे अजून सुरू झाली नाहीत असा टोला सरकारला लगावला. पुढे बोलताना आम्ही यांना समर्थन दिले याचा अर्थ असं नाही की, वाईट गोष्टींनाही आमचं समर्थन असेल, कोणीतरी बोलायला पाहिजे, ते आम्ही बोलतोय, या मागे भावना कोणावर टीका करायची नाही तर या कामाकडे लक्ष द्या अशी आहे. जिथे कामे झालेली नसेल तिथे आम्ही बोलणारच, आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा दिला याचा अर्थ असा नाही जे चाललंय ते सर्वच आम्ही खपवून घेऊ, जिथे अन्याय दिसेल तिथे आम्ही बोलणार, आमच्या पद्धतीने मांडणार असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला दिलाय.

Raju Patil | Eknath Shinde
बॅडमिंटनमध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक, लक्ष्य सेनने मारली बाजी

ठाण्याचे मुख्यमंत्री असताना खड्डे भरले जावेत ही अपेक्षा - मनसे आमदार राजू पाटील

पाऊस जोरात होता त्यावेळी खड्डे भरता येत नाही हे समजू शकतो, मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स बनवण्याची घोषणा केली. मात्र, तसे कुठे डोंबवली कल्याणमध्ये कुठे ही झालं नाही, इथे सगळे तात्पुरते काम करून जातायत, इथे प्रशासक आहे, लोकप्रतिनिधी नाहीत, राज्यात मंत्री मंडळ नाही, ४० दिवस झाले दाद मागायची कुठे, ठाण्याचे मुख्यमंत्री असताना आता तरी खड्डे भरले जावेत अशी अपेक्षा आहे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com