ठाकरे बंधू एकत्र येणार? मनसेचा ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव : सूत्र

ठाकरे बंधू एकत्र येणार? मनसेचा ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव : सूत्र

अजित पवारांच्या बंडानंतर राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झालेला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांनी एकत्र यावे, असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.
Published on

मुंबई : अजित पवारांच्या बंडानंतर राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झालेला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांनी एकत्र यावे, असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटत आहे. अशातच, मनसेने ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात नवीन समीकरणे जुळणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मनसे नेते अभिजीत पानसे यांंनी संजय राऊत यांची सामना कार्यालयात भेट घेतली. या भेटीत युतीची चर्चा झाल्याची माहिती आहे. अभिजीत पानसे - संजय राऊतांनी भांडुप ते प्रभादेवी कारमधून एकत्र प्रवास केल्याचेही समजत आहे. अभिजीत पानसे यांच्या भेटीनंतर संजय राऊत मातोश्रीवर पोहोचले आहेत. तर, अभिजीत पानसे यांनी घेऊन आलेल्या प्रस्तावावर प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चांना जोर आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com