छत्रपती संभाजीनगरात मनसेचा मोर्चा पोलिसांनी अडवला, आंदोलकांची धरपकड

भर पावसामध्ये पोलिसांनी या मोर्चेकर्‍यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मनसे सैनिकांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वप्नपूर्ती आंदोलन आणि मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चा काढला आहे. यावर कारवाई करत भर पावसामध्ये पोलिसांनी या मोर्चेकर्‍यांना अडवण्याचा प्रयत्न केला. व मनसे सैनिकांची धरपकड केली आहे.

छत्रपती संभाजी नगर नामांतरण झाल्यानंतर या नामांतराचा विरोध करण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलनास सुरुवात केली. याविरोधात छत्रपती संभाजीनगर नामांतर झाल्यानंतर ही आमची स्वप्नपूर्ती झाली, असं म्हणत आज मनसेच्या वतीने उत्तर देण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, पोलिसांनी मनसेच्या मोर्चाची परवानगी नाकारली असताना सुद्धा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चादरम्यान पोलिसांनी मनसे सैनिकांना ताब्यात घेतलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com