MNS Leader Vaibhav Khedekar
MNS Leader Vaibhav KhedekarTeam Lokshahi

मनसेचे नेते वैभव खेडेकर पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता

वैभव खेडेकर यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अन्यायाचा प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे.
Published by :
Vikrant Shinde
Published on

निसार शेख, चिपळूण

कोकणातील मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असून मागासवर्गीयांच्या निधीचा गैरवापर करत शासनाची व मागासवर्गीयांची फसवणूक केल्याप्रकरणी वैभव खेडेकर यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अन्यायाचा प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आज करण्यात आली आहे.

MNS Leader Vaibhav Khedekar
"मला वाटतं नोटांवर बाळासाहेबांचा फोटो असला पाहिजे, पण..." अनिल परबांचं विधान

खेडचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून ही मागणी केली असल्याची माहिती आरपीआय आठवले गटाने पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांकडून न्याय मिळाला नाही तर आरपीआय आठवले गट उग्र आंदोलन छेडल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे यांनी दिला आहे.गेल्या काही दिवसांपूर्वीच मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्यावर मागासवर्गीयांच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी समाजकल्याण विभागाच्या आयुक्तांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात वैभव खेडेकर यांना जिल्हा न्यायालयाने दिनांक 4 नोव्हेंबर पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

आता आरपीआय आठवले गटाने केलेल्या मागणीनुसार जर वैभव खेडेकर यांच्यावर अट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला तर वैभव खेडेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गणेशोत्सवातील लॉटरी प्रकरण, खेड नगरपालिकेतील डिझेल घोटाळा आणि मागासवर्गीयांच्या निधीचा गैरवापर या प्रकरणात आधीच अडचणीत आलेले वैभव खेडेकर हे पुन्हा एकदा अट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com