'#फालतू_राजकारण' नोटांवरील फोटोच्या राजकारणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया
अमोल धर्माधिकारी, प्रतिनिधी
दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनातील नोटांवर असलेल्या फोटोंबाबत केलेल्या मागणीनंतर आता विविध पक्षांतून विविध मागण्या केल्या जात आहेत. आता मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करून या विषयावर आपलं मत मांडलं आहे.
काय आहे राजू पाटलांचं ट्वीट?
'सध्याचे राजकारण पाहून जनता #NOTA वापरायच्या मुड मध्ये आहे.त्यामुळे महागाई कमी करा,शेतकरी बांधवांना दिलासा द्या,रस्ते चांगले करा,चांगली शिक्षण व आरोग्य व्यवस्था उभी करा,रूपया मजबूत करा.उगीचच कशाला त्या नोटा व फोटोंच्या मागे लागलाय ? सामान्यांना याचा काय फायदा ? #फालतू_राजकारण' असा मजकूर या ट्वीटमध्ये लिहीला आहे.
दरम्यान, या विषयावर बोलताना शिवसेना नेते अनिल परब यांनी, " मला असं वाटतं की बाळासाहेबांचा फोटो असला पाहिजे पण, माझ्या वाटण्याने काही होत नाही." अशी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले होते केजरीवाल?
"आपण सर्वजण दिवाळीला गणपती आणि लक्ष्मीची पूजा करतो. सर्वांनी शांती आणि आनंदासाठी देवाकडे प्रार्थना केली. कुटुंबासहआम्हीही देशाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. आपण पाहतो की जे व्यवसाय करतात ते लक्ष्मी-गणेशाची मूर्ती ठेवतात. याच आधारावर या दोघांचं चित्र नोटांवर घेतलं पाहिजे", असे केजरीवाल यांनी म्हटलं आहे.