मनसेचं पोट्टच तुमच्यावर वरवंटा फिरविणार : राज ठाकरे
सूरज दहाट | नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एक दिवसीय नागपुर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मनसेचा मेळावा झाला आहे. आजचे राजकारण बघिल्यावर सगळ्या गोष्टी पटकन हव्या आहेत. मात्र, त्यासाठी जीवाचे रान करावे लागते. माझ्या आयुष्यात अनेक संकटे आली, खचलो नाही कधी, खचणारही नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, माझा अजूनही म्हणावा तसा खोकला कमी झाला नाही. त्यामुळं फार वेळ बोलणे जमणार नाही. पत्र वाटताना कट आउट ठेवला असता तरी चालला असता. पत्र देण्यासाठी तीनशे माणसे मुंबईत बोलविण्यापेक्षा एक माणूस नागपूरात आलेला बरा. मागच्या केली मी दौरा केला तेव्हा माणसं मिळत नाही अशा बातम्या आल्या होत्या. त्यामुळं आज ही पत्र वाटली. त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आजचा दिवस आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
काहीजण काही पक्षांची दलाली करतात. महात्मा गांधींचे वाक्य लक्षात असावे. सुरुवातीला काम करत असतात त्यावेळी विरोधक हसतात. कालांतराने दुर्लक्ष करतात, मग ते लढायला येतात. मग, आपण जिंकतो, असे त्यांनी म्हंटले आहे. प्रत्येक राजकीय पक्ष या फेजमधून गेला आहे. पूर्वी विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होता, आता भाजपचा आहे. कारण लोकं कंटाळतात. आता म्हणणार मनसेचं हे पोट्ट काय करणार, पण हेच पोट्ट तुमच्यावर वरवंटा फिरविणार, असेही राज ठाकरेंनी म्हंटले आहे.
पराभव कुणाचा झाला नाही. संघाच्या स्थापनेनंतर जनसंघ पक्ष काढला. 1952 साली जन्माला आलेला जनसंघ 1980 ला भारतीय जनता पक्ष झाला. 2014 मध्ये त्यांना यश आलं. काँग्रेसचा संघर्ष सुद्धा कमी नाही. 1966 साली जन्माला घातलेली माझ्या काकांनी शिवसेना खऱ्या अर्थाने 1995 साली सत्ता आली. आजचे राजकारण बघिल्यावर सगळ्या गोष्टी पटकन हव्या आहेत. मात्र, त्यासाठी जीवाचे रान करावे लागते. माझ्या आयुष्यात अनेक संकटे आली, खचलो नाही कधी, खचणारही नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
ज्या घरात मी लहानाचे मोठे झालो. त्या घरी अनेक लोकं रडत यायचे. एकदा बाळासाहेबांना एकदा बाहेर जायचे होते. ड्रायव्हर आला नाही. मुंबईचे महापौर आले. पण त्यात ते बसले नाही. तर ते टॅक्सीत बसले. मागून लाल दिव्याची गाडी येत होती, कारण पॉवर त्या टॅक्सीत होती, असा किस्साही राज ठाकरेंनी मेळाव्यात सांगितला.
तुम्हीच सर्व पदं घ्या, मला काहीही नको. त्यासाठी मेहनत घ्या. सर्व इतिहास अपमानातून घडला आहे. महात्मा गांधी यांचे उदाहरण आहे. लोकं अपमान करतील, शिव्या देतीय, कौतुक ही करतील. मात्र, जमिनीत आपले पाय घट्ट रोवून घेवा. तुम्ही कुठेही असा दुसऱ्याला तुच्छ मानू नका. तुमचेच नुकसान होईल, असा सल्ला त्यांनी नवनियुक्त कार्यकर्त्यांना दिला.