गजानन काळेंचे टि्वट अन् मुख्यमंत्री बदलाची चर्चा
मुंबई
मनसे नेते गजानन काळे (gajanan kale mns)यांनी मंगळवारी टि्वट केले आणि मुख्यमंत्री बदलाची चर्चा राज्यात सुरु झाली. अखेरी शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil)यांना खुलाशा करावा लागला.
"राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विधानावरून भविष्यात त्यांना सेनेचा मुख्यमंत्री नको असे चित्र दिसतंय.
गजानन किर्तीकर,खासदार संजय जाधव,श्रीकांत शिंदे व इतर सेना नेते राष्ट्रवादीबद्दल उघड नाराजी बोलून दाखवू लागले आहेत.",असे टि्वट गजानन काळे यांनी केले. तसेच संजय राऊत राष्ट्रवादीची तळी उचलण्यात मग्न आहे.
पुन्हा दुसरे एक टि्वट त्यांनी संजय राऊत व सुप्रिया सुळे यांच्या विधानांची दखल घेऊन केले.
"पुढची २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार - विश्वप्रवक्ते संजय राऊत
पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचा होऊ दे ,नवस फेडणार- सुप्रिया सुळे
मग काँग्रेस काय फक्त सतरंज्या उचलणार ???"
गजानन काळे यांच्या दोन टि्वटनंतर अडीच वर्षानंतर राज्यात मुख्यमंत्री बदलणार का? अशी चर्चा सुरु झाले. या चर्चेवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री पदाबाबत बदल करण्याचा निर्णय नाही. उद्धव ठाकरे पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करतील. महाविकास आघाडीने यापुर्वीच ही भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे तुळजापूर दौऱ्यावर होत्या. त्यांनी भवानी मातेचं दर्शन घेऊन माध्यमांशी संवाद साधतांनाा आपली इच्छा बोलून दाखवली. त्या म्हणाल्या, “राज्यात अजूनपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झालेला नाही. राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. यामुळे आता पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. अंबाबाईच्या आशीर्वादाने जर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन”.
काय म्हणाले संजय राऊत
सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानानंतर संजय राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री असून हेच २५ वर्ष मुख्यमंत्री राहतील. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सर्वजण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर समाधानी आहेत. त्याच्यामुळे कोणी प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे,”