ग्लॅमर दिसलं की हुरळून जाणाऱ्या राजकारण्यांना हे खड्डे दिसत नाहीत? मनसेचा सवाल

ग्लॅमर दिसलं की हुरळून जाणाऱ्या राजकारण्यांना हे खड्डे दिसत नाहीत? मनसेचा सवाल

मुंबईतील गोरेगाव भागातील फिल्मसिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबईतील गोरेगाव भागातील फिल्मसिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे आहे. यावरुनच मनसेने जोरदार हल्लाबोल केला आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी या रस्त्याचे फोटो शेअर केले आहेत आणि राजकारण्यांना प्रश्न विचारला आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मुंबईला मायानगरी म्हणतात ते या दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच फिल्मसिटीमुळे. इथे ४२ आउटडोअर शूटिंग लोकेशन्स आणि १६ स्टुडिओ फ्लोअर्स आहेत.

टीव्ही मालिका, चित्रपट यांच्या शूटिंगसाठी हजारो माणसं इथे उपनगरातून येत असतात, पण आत प्रवेश केल्यावर अशा घाणेरड्या रस्त्यांवरुन ये-जा करावी लागते. ग्लॅमर दिसलं की हुरळून जाणाऱ्या राजकारण्यांना हे खड्डे दिसत नाहीत? तुम्ही सुविधाच दिल्या नाहीत म्हणून उद्या हा चित्रपटउद्योग राज्याबाहेर गेला तर त्यांना चूक तरी कसं म्हणणार? असे ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com