'मशिदीवरील भोंगे काढा, अन्यथा...', नागपुरमध्ये मनसैनिकांचा इशारा
मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) ह्यांनी गुढीपाडवा मेळाव्यात (MNS Melawa) केलेल्या भाषणामध्ये मशिदीवर असलेले भोंगे उतरवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घ्यावा अन्यथा मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावण्याचा थेट इशाराच दिला होता. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांकडून (MNS Workers) हनूमान चालीसा लावण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
आता नागपूरमध्ये मनसैनिकांनी (Nagpur MNS) पोलिस आयुक्तांची भेट घेऊन ह्या संदर्भातील निवेदन देण्यात आले आहे. 'हायकोर्टाच्या आदेशानुसार नागपूर शहरातील मस्जिदीवरील सर्व भोंगे काढण्यात यावे अन्यथा नागपूर शहरात मनसे राज ठाकरे यांचा आदेशानुसार सर्व मस्जिदी समोर येत्या काही दिवसात हनुमान चालीसा मोठ्या प्रमाणात लावण्यात येईल व त्यानंतर शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास ती संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.' असा ह्या निवेदनाचा आशय होता.