MLA disqualification : ठाकरे गटाकडून नवी याचिका दाखल
ठाकरे गटाकडून आज आणखी एक याचिका दाखल करण्यात आली
ठाकरे गटाकडून आज आणखी एक याचीका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत मागणी करण्यात आली आहे की आधीच्या तीन रीट याचिकांची एकत्रित सुनावणी शेड्युल दहाच्या अंतर्गत करण्यात यावी. यावर विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार सुनावणी कुठल्या याचिकांची घ्यायची याचा सर्वस्वी अधिकार अध्यक्षांचा आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार तीन रीट याचिकांवर सुनावणी होणार आहे.
ठाकरे-शिंदे गट आमदार अपात्रतेबाबत 2 आठवड्यांनी सुनावणी होणार
ठाकरे-शिंदे गट आमदार अपात्रतेबाबत 2 आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. शिंदे गटाला याचिकेत दाखल केलेली कागदपत्र प्राप्त न झाल्याने बाजू मांडण्यास अडचण निर्माण झाली. त्यामुळे दोन आठवड्याचा वेळ द्यावा अशी विनंती शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली. यामध्ये एक आठवड्याचा वेळ दोन्ही गटांना कागदपत्र एकमेकांना देण्यासाठी व त्यानंतर लेखी म्हणणं मांडण्यासाठी देण्यात आला आहे.
विधानसभा अध्यक्षांकडून शिंदे गटाला दोन आठवड्यांचा वेळ
विधानसभा अध्यक्षांकडून शिंदे गटाला दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. दोन आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी होणार. एकमेकांचे कागदपत्र मिळावे यासाठी दोन आठवड्यांची वेळ देण्यात आली आहे.
सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली आहे. ती आम्हाला देण्यात यावी - शिंदे गटाचे वकील अनिल साखरे
सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली आहे. ती आम्हला देण्यात यावी. दोन आठवड्याची वेळ दिली आहे. दोन आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी होणार. एकमेकांचे कागदपत्र मिळावे यासाठी दोन आठवड्यांची वेळ देण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्षांसमोर शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू
विधानसभा अध्यक्षांसमोर शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू झाला आहे. शिंदे गटाचे वकील अनिल सिंग आता बाजू मांडत आहेत. शिंदे गटाकडून यावेळी जोरदार युक्तिवाद सुरू आहे.
सर्व याचिकांची एकदाच सुनावणी घ्या, ठाकरे गटाची मोठी मागणी
सर्व याचिकांची एकदाच सुनावणी घ्या, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. तर या मागणीवर शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे.
चित्रीकरण करण्यास मज्जाव करुन कागदपत्रे सादर करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश
विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या वकिलांना कागदपत्रे सादर करण्यास सांगितलं आहे. चित्रीकरण करण्यास मज्जाव करण्यात आला असून फक्त कागदपत्रे सादर करण्याचे विधानसभा अध्यक्षांनी आदेश दिले आहेत.
आमदार अपात्रतेप्रकरणी शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरू
आमदार अपात्रतेप्रकरणी शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरू. वकील अनिल सिंग यांच्याकडून जोरदार युक्तिवाद सुरु झाला आहे.
आजच निर्णय द्या; सुनील प्रभू करणार मागणी
आज सुनावणी झाल्यानंतर आजच निकाल देण्यात यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू हे करणार आहे. तसं पत्रच ते विधानसभा अध्यक्षांकडे करणार आहेत.
शिंदे गटाचा विधानसभा अध्यक्षांपुढे मोठा युक्तीवाद
आम्हाला याचिकेची कागदपत्रे मिळाली नाहीत. कागदपत्रे मिळाली नसल्यानं बाजू मांडण्यास अडचण. ठाकरे गटाकडून जी याचिका दाखल करण्यात आली होती त्याची कागदपत्रे मिळाली नाहीत
आमदारांची सुनावणी सुरू, ठाकरे गटाकडून पहिला युक्तिवाद
विधानसभा अध्यक्षांपुढे सुरुवातीला देवदत्त कामत यांच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या आमदारांची बाजू ऐकून घ्यायला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाकडून कागदपत्रे सादर करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून युक्तीवादाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. वकील असीम सरोदेही बाजू मांडत आहेत.