Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू शरद पवार यांच्या भेटीला; म्हणाले...

Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू शरद पवार यांच्या भेटीला; म्हणाले...

आमदार बच्चू कडू शरद पवारांची भेट घेणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आमदार बच्चू कडू शरद पवारांची भेट घेणार आहेत. पुण्यातील मोदीबाग निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, भेट अगोदरच ठरली होती. आमच्या मुद्द्यासंदर्भातील जी लढाई आहे. काल जो मोर्चा आम्ही काढलेला आहे. त्या संदर्भातला आम्ही जसं सरकारला निवेदन दिलं. तसं पवारसाहेबांसोबतही त्या मुद्द्यावर चर्चा करत आहे.

मुद्दे महत्वाचे आणि मुद्द्या संदर्भातच राजकारण झालं पाहिजे. जसं जाती, धर्मावर राजकारण होते. तसं शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि जे काही अडचणीत असणारं लोक आहेत त्याच्यावर राजकारण झालं पाहिजे. ते मुद्दे घेऊन चर्चेला आलं पाहिजे. तो प्रश्न निकाली लागला पाहिजे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, मी कोणावर आरोप केलेला नाही आहे. 1सप्टेंबरपर्यंत आम्ही युतीला सरकारला वेळ दिलेला आहे. तोपर्यंत या सगळ्या संदर्भात इतरही पक्षांशी या मुद्द्यासंदर्भात सहमत होतं का? त्याच्यावर चर्चा कशी करता येईल. शेतकरी, मजूराचे प्रश्न महत्वाचे आहेत. बच्चू कडू स्वत:साठी कधी नाराज नसतात. नसणारही नाही कधी. असे बच्चू कडू म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com