Shambhuraj Desai | Ajit Pawar
Shambhuraj Desai | Ajit PawarTeam Lokshahi

धर्मरक्षक का म्हणायचं नाही? शंभुराज देसाईंचा अजित पवारांना सवाल

मग छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर, धर्मरक्षक का म्हणायचं नाही?
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानांचे सत्र राजकीय मंडळींकडून सुरु आहे. याच दरम्यान काल हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक विधान केले होते. त्या विधानावरून सध्या प्रचंड वादंग निर्माण झाले आहे. या विधानावर आक्रमक प्रतिक्रिया येत असताना त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदार मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Shambhuraj Desai | Ajit Pawar
'सात जन्मात कळणार'...पवारांच्या 'त्या' विधानाचा निलेश राणेंनी घेतला समाचार

काय म्हणाले देसाई?

अजित पवार यांच्या विधानावर बोलताना देसाई म्हणाले की, “मोगलांनी छत्रपती संभाजी महाराजांना धर्मपरिवर्तन करण्यासाठी ४० दिवस त्यांचे हाल केले. पण संभाजी महाराजांनी हिंदू धर्मरक्षणासाठी आपल्या देहाचं बलिदान दिलं. पण त्यांनी धर्म सोडला नाही. मग छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर, धर्मरक्षक का म्हणायचं नाही?” असा सवाल शंभूराज देसाईंनी उपस्थित केला आहे.

काय म्हणले होते अजित पवार?

महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणई घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असे अजित पवार कल म्हणाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com