अमरावती (सूरज दाहाट) : विधान परिषद (Legislative Council) निवडणुकीत आपापल्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी महाविकास आघाडी सह भाजपकडून (BJP) प्रचंड पैसा खर्च करण्यात येत आहे. आमदारांची विशेष बडदास्त ठेवली जात असून त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था पंचतारांकित अशा 'द रिट्रीट' आणि 'ट्रायडंट' हॉटेलमध्ये करण्यात येत आहे. सर्वपक्षीय आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. मात्र, जमिनीवर राहून काम करणारे आमदार व राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) मात्र बिनधास्तपणे मुंबईच्या पवई येथील एका चहाच्या टपरीवर जाऊन अगदी सामान्या सारखे बसून चहा बिस्कीटवर ताव मारला. (Minister, MLA in a five star hotel and Bachchu Kadu at a tea tapri Legislative Council)
बच्चू कडू हे मंत्री पदाचा कोणताही आव न आणता आजही जमिनीवर आहेत. दुसरीकडे सर्व आमदार हॉटेल मध्ये असताना बच्चू कडू मात्र बिनधास्त आहेत. राज्यसभा निवडणूकीत देखील बच्चू कडू हे कोणत्याही हॉटेल मध्ये गेले नव्हते. अगदी मतदानाच्या आदल्या दिवशी बच्चू कडू मुंबईत गेले होते. टपरीवर चहा बिस्किटे खातानाचा हा व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.