Gulabrao Patil
Gulabrao PatilTeam Lokshahi

महाराजांवर बोलण्याचा कुण्या मायच्या लालला.., गुलाबराव पाटीलांचा घरचा आहेर

पुन्हा जर अवमान केला तर मंत्रीपद गेल खड्ड्यात यांना सोडणार नाही.
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच एका पाठोपाठ वादग्रस्त विधानाचे सत्र सुरु आहे. त्यातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता भाजपचे आमदार प्रसाद लाड वादात सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाल्याचं अजब विधान लाड यांनी केले आहे. इतिहासाचीच मोडतोड होत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधक आता पुन्हा आक्रमक झाले आहे. त्यावरच आता राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही लाड यांना घरचा आहेर दिला आहे.

Gulabrao Patil
महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांनी चैत्यभूमीवर येऊ नये, आनंदराज आंबेडकरांचे विधान

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला वादग्रस्त विधान प्रसाद लाड यांनी केल्यानंतर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा समाचार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा कुण्या मायच्या लालला अधिकार नाही. शिवरायांबद्दल कोणीही वाकड तिकडं बोलत असेल तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला माफ केलं जाणार नाही. शिवरायांच्या नखाची बरोबरी हे नालायक करू शकत नाहीत. पुन्हा जर अवमान केला तर मंत्रीपद गेल खड्ड्यात यांना सोडणार नाही, असा इशाराच गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

पुढे ते म्हणाले की, चार महिने झाले विरोधकांकडून सतत टीका सुरू आहे. आमच्या विकास कामांची जी गती आहे ती जनतेला आवडत आहे. आता मुख्यमंत्र्यांवर जे पैशांच्या उलाढालीचे गंभीर आरोप केले जात आहेत, त्याने जनतेचे पोट भरत नाही. मागच्या दरवाजांनी निवडून आलेल्या संजय राऊत यांना पुढच्या दरवाजाने कसे निवडून यायचं हे माहीत नसल्याने ते अशा पद्धतीने गंभीर आरोप करत आहेत, असा टोला त्यांनी राऊत यांना लगावला.

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी इमान विकलेल्या लोकांचे सरकार लवकरच पडेल अशी टीका केली आहे. त्यालाही पाटील यांनी जोरदार उत्तर दिले. ते वारंवार सरकार पडणार असल्याचं सांगत आहे. मीही किती दिवसांपासून तीच वाट पाहत आहे. सरकार म्हणजे काय डोंबाऱ्याचा खेळ आहे का? पोरगी वर दोरीवर चालतेय आणि खाली डोंबारी वाजवतोय. वाजू द्या. त्यांना काय वाजवायचं ते वाजू द्या, अशी टीका त्यांनी आदित्य ठाकरेंवर केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com