मायावतींचा मोठा निर्णय! बसपाचा उत्तराधिकारी केला घोषित

मायावतींचा मोठा निर्णय! बसपाचा उत्तराधिकारी केला घोषित

बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) सुप्रीमो मायावती यांनी आज पक्षाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. या बैठकीत मायावतींनी आपला उत्तराधिकारी घोषित केला आहे.
Published on

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) सुप्रीमो मायावती यांनी आज पक्षाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. या बैठकीत मायावतींनी आपला उत्तराधिकारी घोषित केला आहे. बसपा पुढील उत्तराधिकारी त्यांचा पुतण्याला आकाश आनंद यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या बैठकीत मायावतींनी पक्षाच्या सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आणि आता राज्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना बोलावले होते.

मायावतींचा मोठा निर्णय! बसपाचा उत्तराधिकारी केला घोषित
'मुख्यमंत्र्यांनी स्वतःची एफडी नक्कीच वाढवली' मुख्यंमंत्र्याच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

आकाश आनंदने लंडनमधून मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) केले आहे. त्यांचा राजकारणात प्रवेश 2017 मध्ये झाला होता, जेव्हा ते सहारनपूरच्या सभेत पहिल्यांदा मायावतींसोबत स्टेजवर दिसले होते. आकाश सध्या पक्षाचा राष्ट्रीय समन्वयकही आहे.

आकाश आनंद यांनी राजस्थान निवडणुकीत बसपाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी अनेक दिवस राज्यात पदयात्राही केली. विधानसभा निवडणुकीत पक्षाला 2 जागा मिळाल्या. राज्यात पक्षाला ५ टक्क्यांहून अधिक मते मिळाली. यानंतर आगामी निवडणुका लक्षात घेता आकाश आनंदची जबाबदारी वाढणार असल्याची चर्चा होती.

दरम्यान, मायावतींनी आपल्या पुतण्याला उत्तराधिकारी म्हणून घोषित करताच आकाश आनंद यांच्या संघटनात्मक क्षमतेबाबत राजकीय वर्तुळात नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. बसपाने अनुभवी नेत्यांकडे दुर्लक्ष करून तरुण चेहऱ्यावर बाजी का मारली? याबाबत अद्याप कोणतीही राजकीय प्रतिक्रिया आलेली नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com