Uddhav Thackeray: मशालीची धडक मुंबई द्वेष्ट्यांच्या बुडाला लावणार की नाही? उद्धव ठाकरे म्हणाले...
मार्मिक'चा आज 64 वा वर्धापन दिन सोहळा आहे. साप्ताहिक मार्मिकचा 64वा वर्धापन दिन सोहळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आणि मार्मिकचे संपादक उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी मंदिर, दादर इथे सोहळा पार पडला. मार्मिकच्या अंकांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलं. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. 'मार्मिक'च्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
आत मध्ये सर्व कलाकार रंगलेला नाटक पुढे नेते तयारीत असतात उत्साहात असतात. पूर्वी दूरदर्शनमध्ये रंगलेल्या कार्यक्रमात मुंग्या यायच्या, व्याख्या यायचा, तुम्ही मार्मिकचं वय सांगितलं त्याबरोबर माझं वय सुद्धा सांगितलं. बाळासाहेब नेहमी सांगायचे वय नेहमी वाढतं पण माणूस जेव्हा थकतो तेव्हा त्याचा वय वाढतं. मार्मिक हा एक चमत्कार आहे. शिवसेना हा सुद्धा एक चमत्कार आहे. एका व्यंगचित्रकाराने आपल्या कुंजण्याच्या ताकदीवर एवढी मोठं इतिहास घडवला होता. ते करमणुकीचे कार्यक्रम असताना बाळासाहेब आणि काका श्रीकांत यांनी हे सुरु केलं. व्यंगचित्र पाहता पाहता मी मोठा झालो. मी मार्मिकचा संपादक झालो नंतर सामनाचा संपादक झालो. शिवसेना स्थापन झाली तेव्हा नारळ फोडला त्याचे पाण्याचे शिंतोडे माझ्यावर उडाले आणि मी शिवसेना पक्ष प्रमुख झालो. तुमची साथ असेल तर मी शत्रूची परवा करत नाही. वाचा आणि थंड बसा हे सर्वांना माहित आहे. मग आजोबांनी बाळासाहेबांना विचारले कि संघटना काढतोस की नाही? मग नाव काय ठेवणार तर शिवसेना. मार्मिकची सुरुवात अशी झाली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठी माणसाने संघर्ष करून मिळवलेल्या राजधानीमध्ये पुन्हा मराठी माणसावर हेच दिवस येणार असतील पुन्हा एकदा हेच सुरू होईल. आज कुंचल्याची मशाल झाली आहे. अशावेळी मशालीची धडक त्यांच्या बुडाला लावणार की नाही. दोन लोकं आपल्या तत्त्वावर दिल्लीत जाऊन बसले आणि आता पुन्हा आपल्यालाच लाथा मारणार असतील त्यांच्या तंगड्या खेचून यांना आणणार की नाही आणणार. गोडी मीडिया आहे हे ठीक आहे पण खणखणीत आवाज हा मार्मिक करणार आणि खणखणीत आवाज हा आज सामना आहे. आज सर्व आमचे ज्येष्ठ नेते वयाचे अंतर न मानता आज मला नेता म्हणतात हे त्यांचे मोठेपण आहे आणि हा फक्त मार्मिकचा वर्धापन दिन नाही तर हा एक महाराष्ट्राचा आणि वसा घेतल्याचा वर्धापन दिन आहे.
भास्कर जाधव तुम्ही म्हणालात की वर्गणी वाढवा. नंतर कोणीतरी म्हणेल की वर्गणीदार जास्त म्हणजे मार्मिक माझा. कोणीतरी हॉटेलमध्ये जाईल आणि सर्व रूम बुक करेल आणि म्हणेल हॉटेल माझं, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.