राजकारण
जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा, जरांगे पाटील काय निर्णय घेणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाची सह्याद्री अतिथीगृहात मध्यरात्रीपर्यंत बैठक पार पडली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाची सह्याद्री अतिथीगृहात मध्यरात्रीपर्यंत बैठक पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. जरांगे पाटील आज 11 वाजता आपला पुढचा निर्णय जाहीर करतील. त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
या बैठकीमध्ये जरांगे पाटील शिष्टमंडळाने नुकताच काढलेल्या जीआरमध्ये काही अटी न ठेवता सरसकट सर्वाना प्रमाणपत्र द्यावे ही मागणी करण्यात आली. तर जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती या बैठकीत सरकारकडून शिष्टमंडळाला करण्यात आली आहे.
तब्बल अडीच तास ही बैठक चालली. जरांगे पाटील आज यासंदर्भात आपली पुढची भूमिका मांडतील असं यावेळी शिष्टमंडळाच्या आणि सरकारच्या वतीनं सांगण्यात आले आहे.